पिंपरी : पुण्याच्या आंबेगावमध्ये तीन मुलं घोडनदीत बुडाली आहेत. स्थानिक पातळीवर त्या तिघांचं शोधकार्य सुरू आहे. वैभव वाव्हळ (वय 16), श्रेयस वाव्हळ (वय 15) आणि प्रणय वाव्हळ (वय 15) अशी तिघांची नावं आहेत. हे तिघेही मित्र असून तिघे शिंगवे गावातील आहेत. रविवार असल्याने सुट्टीचा आनंद लुटण्याचा या तिघांनी बेत आखला.
दुपारी हे तिघे मीना आणि घोड नदीच्या संगमाजवळ पोहायला गेले होते. पण पाण्याचा प्रवाह अधिक होता, तरी या तिघांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. ते पोहायला उतरलेच अन् पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सायंकाळ झाला तरी तिघे घरी परतले नाहीत. त्यामुळे तिघांचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी शोधाशोध सुरू केली.
इतर मित्रांकडे, गावकरी यांच्याकडे विचारपूस करून झाली, पण काही सुगावा लागेना. शेवटी सायंकाळी सहाच्या सुमारास नदी किनारी त्यांचे कपडे, चपला, मोबाईल आणि इतर वस्तू आढळल्या. त्यामुळं ते तिघे पोहायला पाण्यात उतरल्याने वाहून गेल्याचा अंदाज बांधण्यात आला. मंचर पोलिसांना याची खबर देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पातळीवर शोध घेण्यास अपयश आल्याने, आता एनडीआरच्या टीम ला पाचारण करण्यात आलंय.
पुण्याच्या आंबेगावमध्ये तीन मुलं घोडनदीत बुडाली, शोधकार्य सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2019 10:47 PM (IST)
पाण्याचा प्रवाह अधिक होता, तरी या तिघांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. ते पोहायला उतरलेच अन् पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सायंकाळ झाला तरी तिघे घरी परतले नाहीत. त्यामुळे तिघांचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी शोधाशोध सुरू केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -