दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली नाही. आता शिवसेनेनं जवळपास 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत तर भाजपची यादी जाहीर होताच तासाभरात उमेदवरांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. भाजपनं विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
युतीच्या घोषणेआधी शिवसेनेनं संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. तसंच यादी जाहीर होताच एका तासात उमेदवाराला एबी फॉर्म वाटले जाणार आहेत.
राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. संघटन मंत्री मुंबई - सुनील कर्जतकर, कोकण ठाणे - सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र - किशोर काळकर, मराठवाडा - भाऊराव देशमुख, विदर्भ - उपेंद्र कोठेकर, पश्चिम महाराष्ट्र - रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे. दरम्यान, आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे एबी फॉर्मचे वाटप झालेले उमेदवार (मुंबई सोडून राज्यातील इतर ठिकाणच्या इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत.)
1. राजेश क्षीरसागर -
2. संग्राम कुपेकर - चंदगड (कोल्हापूर)
3. संदीपान भुमरे - पैठण
4. संजय शिरसाट - औरगाबाद पश्चिम
5. अर्जुन खोतकर - जालना
6. सुजित मिणचेकर - हातकणंगले (कोल्हापूर)
7. संतोष बांगर - हिंगोली
8. अजय चौधरी - शिवडी (मुंबई)
9. गौतम चाबुकस्वार - पिंपरी (पुणे)
10. उदय सामंत - रत्नागिरी
11. भास्कर जाधव - गुहागर
12. योगेश कदम - दापोली
13. राजन साळवी - राजापूर
14. अनिलराव बाबर - खानापूर-आटपाडी (सांगली)
15. अनिल कदम - निफाड (नाशिक)
16. योगेश घोलप - देवळाली (नाशिक)
17. राजाभाऊ वाजे - सिन्नर (नाशिक)
18. यामिनी जाधव - भायखळा (मुंबई)
Congress First List | विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहिर, 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत मतदारसंघ आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा या यादीत झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.
कॉंग्रेसची पहिली यादी
- अॅड. के. सी पाडवी - अक्कलकुवा
- पद्माकर वळवी - शहादा
- शिरीष नाईक - नवापूर
- शिरीष चौधरी- रावेर
- हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा
- अनंत वानखेडे - मेहकर
- अमित झनक - रिसोड
- वीरेंद्र जगताप - धामणगाव रेल्वे
- यशोमती ठाकूर - तिवसा
- अमर काळे - आर्वी
- रणजित कांबळे - देवळी
- सुनील केदार - सावनेर
- नितीन राऊत - नागपूर उत्तर
- विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी
- सतीश वर्जूरकर - चिमूर
- प्रतिभा धानोरकर - वरोरा
- बाळासाहेब मंगळूरकर - यवतमाळ
- अशोक चव्हाण- भोकर
- डी पी सावंत - नांदेड उत्तर
- वसंतराव चव्हाण - नायगाव
- रावसाहेब अनंतपूरकर - देगलूर
- संतोष टारफे - कळमनुरी
- सुरेश वर्पूरडकर - पाथरी
- कल्याण काळे - फुलंब्री
- शेष आसिफ शेख रशीद - मालेगाव मध्य
- रोहित साळवे - अंबरनाथ
- सय्यद हुसेन - मीरा भायंदर
- सुरेश कोपरकर - भांडुप पश्चिम
- अशोक जाधव - अंधेरी वेस्ट
- नसीम खान - चांदीवली
- चंद्रकांत हंडोरे - चेंबूर
- झिशान सिद्दीकी - वांद्रे पश्चिम
- वर्षा गायकवाड - धारावी
- गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा
- अमीन पटेल - मुंबादेवी
- अशोक जगताप - कुलाबा
- माणिक जगताप - महाड
- संजय जगताप - पुरंदर
- संग्राम थोपटे - भोर
- रमेश बागवे - पुणे कॅंटोन्मेंट
- बाळासाहेब थोरात - संगमनेर
- अमित देशमुख - लातूर शहर
- अशोक पाटील निलंगेकर - निलंगा
- बसवराज पाटील - औसा
- मधुकरराव चव्हाण - तुळजापूर
- प्रणिती शिंदे- सोलापूर मध्य
- मौलाली सय्यद - सोलापूर दक्षिण
- ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण
- पी एन पाटील साडोलीकर - करवीर
- डॉ. विश्वजीत कदम - पलूस कडेगाव
- विक्रम सावंत - जत