Bail Pola Weather News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसांवरच बैल पोळ्याचा सण येऊन ठेपला आहे. दरवर्षी पोळ्याच्या सणाला पाऊस पडत असतो. त्यामुळं यावर्षी देखील पाऊस पडणार की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर हवामान अभ्यासक पंजाबराव डख (panjabrao dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा बैल पोळा (Bail Pola) सण पावसात साजरा होणार आहे. बैल पोळ्यादिवशी राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. 


 28 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होणार


बैल पोळा सणाला दरवर्षीच बळीराजाचे स्वागत करण्यासाठी वरून राजे थोड्या तरी प्रमाणत हजेरी लावतात. परंतु यंदा बैल पोळा सण जोरदार पावसात साजरा होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आज 24 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होणार आहे. दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत सूर्यदर्शन होणार नाही.


नदी, नाले आणि ओढे वाहणार


पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 ऑगस्ट रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस होणार आहे. राज्यात ठीक ठिकाणी नदी, नाले आणि ओढे वाहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे. 27 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वत्र असेल पण काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहणार असल्याची शक्यता आहे.


मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार


दिनांक 27 ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. याच बरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक घाट परिसरात जास्त पाऊस राहण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. मात्र दिनांक 28 ऑगस्ट पासून पावसाचा जोर थोडासा कमी होईल व 30 ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहील. पण सप्टेंबर महिना सुरू होताच दिनांक 1 सप्टेंबर पासून राज्यात 4 ते 5 सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पंजाब डख म्हणतात दिनांक 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. पण यानंतर 1 सप्टेंबर पासून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन 5 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे.


बैल पोळा सण यंदा जोरदार पावसात साजरा होणार


यंदाचा बैल पोळा सण जोरदार पावसात साजरा होण्याची शक्यता आहे. कारण 1 सप्टेंबर पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन 2 सप्टेंबर बैल पोळ्या दिवशी राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे यंदाचा बैल पोळा सण जोरदार पावसात साजरा होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या:


Weather Alert : रायगडसह सातारा पुण्यातील काही भागांना रेड अलर्ट, राज्यात पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस, IMD चा अंदाज