अहमदनगर : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली. अडीच लाखाची रोकड भामट्यांनी लांबवली. शहरातील मध्यवर्ती भागात यशवंत कॉलनीतल्या ‘विरंगुळा’ बंगल्यात चोरी झाली.
विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर गडाख यांचा हा बंगला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार यशवंतराव गडाख हे कुटुंबासह विरंगुळा बंगल्यात वास्तव्यास असतात. शनिवारी गडाख कुटुंबियांसह बंगल्यात होते. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा कुलूप तोडून डाव साधला. चोरट्यांनी बंगल्यातील पैशाची बॅगच लांबवली. काही अंतरावर पैसे काढून बॅग फेकून धूम ठोकली. या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात आहे. मात्र तो दुसर्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गेल्यावर भामट्यांनी डाव साधला आहे.
यशवंत कॉलनीत अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींची निवासस्थान आहे. त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे बंगले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच ही वसाहत आहे. मात्र आता इथंही चोर्या होऊ लागल्यानं भीतीचं वातावरण आहे.
माजी खासदार यशवंतराव गडाखांच्या बंगल्यात चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jun 2018 11:09 PM (IST)
यशवंत कॉलनीत अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींची निवासस्थान आहे. त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचे बंगले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच ही वसाहत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -