जेलमधून सुटलेल्या कुख्यात गुंडाची अमरावतीत हत्या, दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2017 06:13 PM (IST)
अमरावती: तरुणीची छेड काढल्याप्रकरणी दीड महिन्याची शिक्षा भोगून बाहेर पडलेला आरोपी अशोक गजभिये याची काल मध्यरात्री अमरावतीतील बडनेरा भागात दोन तरुणांनी हत्या केली. हिराराम रोकडे आणि संतोष परताळे अशा या तरुणांची नावं असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. बडनेरातल्या जयस्तंभ चौकात ही हत्या करण्यात आली. मात्र, परिसरातील ५० ते ६० महिलांनी पुढे येत ही हत्या आम्ही केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी आरोपी रोकडेच्या लहान मुलीसोबत गजभियेनं अश्लील चाळे केले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्या झालेल्या अशोक १४ हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.