मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 आणि 22 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा संयुक्त परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यशावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर 11 ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. अशातचं राज्यात एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली.
MPSCच्या निर्णयावर मंत्री भुजबळ नाराज? म्हणाले,मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं जास्त बोलता येणार नाही