New Year welcome : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील लोक सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात नवे संकल्प घेऊन 2024 ला गुडबाय करत 2025 ला हॅलो  करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईच्या जुहू चौपाटीवर दाखल झाले आहेत. या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. , न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले असून तिथं मोठ्या थाटामाटात जल्लोष होत आहे. 


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पर्यटकांची जुहू चौपाटीला पसंती


मुंबईकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी जुहू चौपाटीला मोठी पसंती दिली आहे.मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मोठा संख्या मध्ये पर्यटक जुहू चौपाटीवर दाखल झाले आहेत. रात्री पर्यटकांची मोठी गर्दी असणार आहे. जुहू चौपाटीवर याच्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून जुहू चौपाटीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षेला कोणतीही बाधा होऊ नये यासाठी सिविल ड्रेसमध्ये मोठ्या संख्येनं महिला अधिकारी कर्मचारी गर्दीमध्ये फिरणार आहेत.




मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकर आणि पर्यटकांची मोठी गर्दी 


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकर आणि पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. 2024 च्या अखेरच्या सुर्यास्ताला आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. सोबतच, पोलिसांचा मोठा बंदोबस्त ह्या संपूर्ण परिसरात आहे. रात्री मुंबईकरांकडून जंगी सेलिब्रेशन ह्या मरीन ड्राईव्ह परिसरात होताना दिसणार आहे. 2024 वर्ष सरला आणि उद्या 2025 चा सूर्योदय होणार आहे, आज 31 डिसेंबर 2024 म्हणजेच या वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाच्या जायकवाडीवरील सुर्यास्ताच  विहंगम दृश्य  पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. 


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पालघरमधील समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर मध्ये देखील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे . पालघरच्या केळवा , चिंचणी , डहाणू , बोर्डी या समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते . मुंबई ठाणे या महानगरांतलगत असल्याने येथील पर्यटक मोठ्या प्रमाणावर सध्या पालघर मध्ये देखील गर्दी करत आहेत. आज संध्याकाळच्या सुमारास पालघर मधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली 


न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरु, मोठ्या प्रमाणात  डोळे दिपवणारी आतिषबाजी सुरु 


भारतातील नवीन वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे. काही तासांत 2025 वर्ष देशभरात साजरे केले जाणार आहे. दरम्यान, सर्व प्रथम, न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले असून तिथं मोठ्या थाटामाटात जल्लोष होत आहे. मोठ्या प्रमाणात  डोळे दिपवणारी आतिषबाजी सुरु आहे.