Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change)  होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा (Heat) चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे, आज सोलापुरचा पारा 41 .1 अंशावर पोहोचला आहे. तसेच कोकणातही सातत्यातनं तापमानात बदल होत आहे. यामुळं आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 

Continues below advertisement


तळकोकणात हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. मध्येच उष्णता तर थंड वातावरण बघायला मिळतंय. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानात सातत्याने वाढ देखील होताना दिसतेय. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार तळकोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दमट वातावरणाचा फटका आंबा, काजू, जांभूळ या पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


सोलापुरात आज पुन्हा एकदा तापमानाने गाठला उच्चांक


सोलापुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात आज पुन्हा एकदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. सोलापुरात आज उन्हाचा पारा 41.1अंशावर पोहोचला आहे.  कालचा तापमानाचा पारा हा 40 अंशावर होता. आज मात्र तापमानाचा पारा 41 अंशावर गेला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे, ज्यामुळं दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशातून दुसरे चक्रीवादळ येत आहे. त्यामुळं पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळांमुळं उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल


दरम्यान, सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं सध्या ढगाळ वातावरण होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशा या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं पिकांना याचा फटका बसत आहे. तसेच वाढत्या उष्णतेबरोबरच राज्याच्या अनेक भागात पाण्याची टंचाई देखील निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरु करण्याची वेळ सरकारवर आली आहे. आणखी एप्रिल आणि मे हे दोन महिने कडक उन्हाचे आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


सावधान! देशातील 18 राज्यात वादळ वारा पावसाचा इशारा, चक्रीवादळाचाही फटका बसण्याची शक्यता