मुंबई : मुंबईतील जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्यावरणमंत्री संजय बनसोडे यांना एक महिन्यापूर्वी देण्यात आलेल्या लसीचा पहिला डोस सिरम कंपनीची आणि एक महिन्यानंतर देण्यात आलेल्या लसीचा दुसरा डोस हा भारत बायोटेक म्हणजेच वेगळ्याच कंपनीचा देण्यात आलाय असा दावा  पर्यायवरण मंत्री संजय बनसोडे यांनी स्वतः केला आहे. 

Continues below advertisement


 पर्यावरण मंत्री संजय बनसोडे अधिवेशनानिमित्त मुंबईत असताना त्यांनी पहिला डोस सिरम कंपनीच्या कोव्हिशिल्डचा घेतला होता. काल जो डोस त्यांना देण्यात आलेला होता तो कोव्हॅक्सिनचा म्हणजेच भारत बायोटेक कंपनीचा घेतला आहे असा दावा संजय बनसोडे यांनी स्वतः केला आहे. काल संजय बनसोडे यांना लस घेतल्या नंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लस देणाऱ्या नर्सला कोणती लस दिली असा सवाल केला असता नर्सने कोवॅक्सिन दिल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर पर्यावरण मंत्र्यांचे धाबेच दणाणले.


"मला चुकीची लस दिली त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मी मंत्री आहे  वाचता येतंय म्हणून मला लक्षात आलं. अडाणी माणसाचं कसं होणार?" असा सवाल बनसोडे यांनी उपस्थित केला. 


 याबाबत  वैद्यकीय संचालक तात्याराव लहाने आणि जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता    यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे असा दावा देखील केला. 


पहिला डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा देण्यात आला तर काही परिणाम होतो का याबाबत संजय बनसोडे यांनी अनेक तज्ज्ञाशी बातचीत केली. त्यातून काही विशेष फरक पडत नाही असा दावा तज्ज्ञांनी केला असल्याची माहिती दिली आहे. मात्र असा गंभीर प्रकार होणं आणि त्यामुळे खरंच काही घडलं तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. 


संबंधित बातम्या :