नोटाबंदी निर्णयानंतर काळा पैसा किती प्रमाणात निघाला हा संशोधनाचा विषय असला तरी या निर्णयामुळे लाचखोरीला काही प्रमाणात लगाम बसला असल्याचं दिसून येत आहे. एकट्या नांदेडमध्ये लाच मागितल्याच्या तक्रारी कमी झाल्या असून राज्यभरातही लाच मागण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे सध्या दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदींनी हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात याचे पडसाद पाहायला मिळाले. लाचखोरांनी या निर्णयावर सावध भूमिका घेतली आहे. एकट्या नांदेडमध्ये महिन्याला सहा ते सात कारवाया केल्या जात होत्या. पण हा निर्णय झाल्यापसून यात घट झाली असून हे प्रमाण पाच वर आले आहे.
नोटाबंदी आणि नव्या नोट्या यामुळे लाचखोरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाचखोरीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचं जाणकार सांगत आहेत. कारण काहीही असले तरी काही दिवसतरी लोकांना लाचखोरीतून सुटका मिळाली आहे.