ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे-फाटक यांच्यात चुरस
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 03:42 AM (IST)
ठाणे : ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे. ठाणे विधान परिषदेसाठीचं मतदान थोड्याच वेळात होणार आहे, तर 6 जून रोजी मतमोजणी होईल. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, आमची सर्व मतं डावखरेंनाच : हितेंद्र ठाकूर 1992 पासून चार वेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वीही ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून जाताना डावखरेंना शिवसेनेबरोबर असलेल्या जवळीकीचा फायदा झाला होता. हितेंद्र ठाकूर यांचा डावखरेंंना पाठिंबा, सेना-भाजपची धावाधाव बविआच्या हितेंद्र ठाकूर यांनी ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना पाठिंबा जाहीर केला होता. हितेंद्र ठाकूरांनी आपली सर्वच्या सर्व 135 मतं वसंतराव डावखरेंचा मिळणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. “मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला” असं हितेंद्र ठाकूर म्हटलं आहे.