Thane : भिवंडी (Bhiwandi) येथील वडपा परिसरात चारचाकी चालकाचा ताबा सुटल्याने एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या 9 जखमींपैकी 4 जणांना भिवंडीतील भिवंडी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. इतर 5 जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि मुंबई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
भिवंडी येथील वडपा परिसरात एका चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटून गंभीर अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई नाशिक हायवे वर वडपा परिसरात रस्त्याने जात असताना एका कंटेनर चालकाने सिग्नल न देता गाडी वळवली. त्यानंतर कंटेनरच्या मागच्या बाजूला असलेल्या एका चारचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो डीवायडर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच विरुद्ध दिशेला जाऊन वाहनांना धडकला. या धडकेत चारचाकी वाहने 2 वाहनांना धडक दिली त्यात 1 रिक्षा आणि 1 दुचाकीचा समावेश आहे. या घटनेत रिक्षेतील 7 जण आणि दुचाकीवरील 2 जण तब्बल 9 जण जखमी झाले आहेत. त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमी झालेल्या 9 जणांपैकी 4 जणांना भिवंडी येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. तर इतर 5 जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि मुंबई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
- 12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार Corbevax? DCGI च्या कमिटीने केली शिफारस
- Covid19 Vaccine : फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा, मंजुरीसाठी अधिक माहिती गरजेची : FDA
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha