मुंबई/ठाणे : ठाण्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं आहेत. ठाणे शहर विभागातून शिवसेनेचे हजारपेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेनेचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोड्याच वेळात कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. ठाण्याचे शहर प्रमुख अविनाश जाधव यांनी हा दावा केला आहे. कळवा-दिव्यातील 90 टक्क्यांहून जास्त कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.

निवडणुकीसाठी सेना-मनसे सज्ज, उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी


कोणालाही तिकीट देण्याच्या आश्वासनावर घेतले नसल्याचं स्पष्टीकरणही जाधव यांनी दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

नाशकात मनसे, राष्ट्रवादीला धक्का, तीन नगरसेवक शिवसेनेत


दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नगरसेवक अशोक सातभाई आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.