ठाणे : पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे. ही टोळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये छेडछाड करायची.

पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचं. त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची.

पोलिसांनी अटक केलेल्या टोळीनं फक्त ठाण्यातच नव्हे तर पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांतल्या पेट्रोलपंपामध्ये हेराफेरी केल्याचं उघड झालं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं कारवाईसाठी या शहारांमध्ये रवाना झाली आहेत.

आता रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे दर बदलणार

विविध शहरातील सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत पेट्रोलचे दर कायम राहतील. त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलतील.