Thane Dombivli News : डोंबिवलीत (Dombivli)  एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गाव देवी मंदिर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या देवाण घेवाणीवरुन शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी सुजल म्हात्रे यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

भररस्त्यात झाला राडा

भररस्त्यात शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी सुजल म्हात्रे यांची गाडी अडवून तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राडा करणाऱ्या रोहन म्हात्रे, रोमेश म्हात्रे, रुचित म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तोडफोड करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Mahesh Chivte: एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावाला मारहाण; आरोपानंतर दिग्विजय बागलांनी केला खुलासा, म्हणाले 'मारहाण करणारा हा माझा कार्यकर्ता पण...'