Radhakrishna Vikhe Patil met Manoj jarange Patil : मराठा उप समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी आज मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची भेट घेतली. यासाठी ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यभरामध्ये ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये नेमकी काय होणार चर्चा?
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील या दोघांच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होती हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. यानंतर सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जरांगे पाटीलयांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पंधरा मिनिटांपासून बंद दाराआड चर्चा सुरु आहे.
दोघांमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा
मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सरायटीमध्ये जाऊन मनोज रंगे यांची भेट घेतली यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला जवळपास सव्वा तास दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली. ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 2 सप्टेंबरच्या जीआर बाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून, उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या असा आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे. 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता, असेही विखे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप देखील विखे पाटील यांनी यावेळी केला. हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भामध्ये प्रकरण न्यायालयात असताना, गावी दाखल करून मोर्चे काढणे योग्य नाही, असं देखील विखे पाटील ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे बावळट अन् मूर्ख, कुठून शोधलं दिवटं? जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल