ठाणे : पँटच्या खिशात मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा पाय भाजला आहे. ठाण्याच्या शहापूरमधील वासिंदमध्ये ही घटना घडली.
करण ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे. मोबाईन फोनचा स्फोट एवढा मोठा होता की, या घटनेत त्याचा पाय भाजला.
कार्बन कंपनीचा हा फोन होता. करणने नेहमीप्रमाणे पँटच्या खिशात मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक स्फोट झाल्याने फोन फुटला आणि त्याच्या डाव्या पायाची मांडी भाजली.
मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?
चार्जिंग सुरु असताना मोबाईल फोनवर बोलू नये.
मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.
फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये.