मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी घोषीत केलं आहे.


शेतकऱ्यांना दिलासा :
शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा :
राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्र स्थापन करणार आहे. तसेच 102 क्रमांकाच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी रुपये 87 कोटी उपलब्ध करून देणार आहे. यापैकी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आरोग्य सेवेकरीता रुपये पाच हजार कोटी व वैद्यकिय शिक्षणाकरिता रुपये 2 हजार 500 कोटी बाह्य सहाय्यित प्रकल्प

कौशल्य विकास :
राज्यातील सर्व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करून आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करणार आहे. यासाठी खाजगी उद्योजकांकडून रुपये 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. शासनाकडून रुपये 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

आमदारांना अच्छे दिन :
महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात सर्व आमदारांना 'अच्छे दिन'. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटींची वाढ. आता आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी 2 कोटींऐवजी 3 कोटींचा निधी मिळणार.

पेट्रोल-डिझेल महागणार :
पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ, अतिरिक्त कर आकारण्याची अजित पवार यांची घोषणा

मुंबईत मराठी भवन बांधणार :
मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार. तसंच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी 148 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा



आरोग्य विभासाठी पाच हजार कोटी
आरोग्य विभागासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारणआर. तसंच डॉक्टरांची संख्यादेखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी. नव्या रूग्णवाहिकांसाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करणार. 20 नवी डायलिसिस सेंटर सुरू करणार. तसंच 996 प्रकारचे उपचार मोफत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

क्रीडा संकुलासाटी 25 कोटींचा निधी
जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी 8 कोटींचा निधी देण्यात येत होता. बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. कबड्डी. कुस्ती स्पर्धांना 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त खोखो व्हॉलिबॉल स्पर्धांनाही 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडी सरकारचा उतारा :
बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडी सरकारचा उतारा. नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजनेची घोषणा. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन मिळून पाच वर्षात 10 लाख सुशिक्षीत बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget | शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पेट्रोल-डिझेल 1 रुपयाने महागणार