औरंगाबादः सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघात घडला. जळगाव रोड वरील पाल फाट्याजवळील गिरजा नदीत टेम्पो कोसळून 3 ठार तर तीस जण जखमी झाले आहेत.


 

 

या अपघातात तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वजण पैठण, शेवगाव तालुक्यातील विजयपुरी येथील रहिवासी आहेत. सर्व प्रवासी गुरुपौर्णिमेनिमित्त आमसारी येथील कृष्णा गिरी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते. पाल फाट्या जवळ परत येताना ही दुर्घटना घडली.

 

 

अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र अपघात भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. काह जणांना नदीतून बाहेर काढण्यात आलं आहे, तर काही प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.