नाशिक : राज्यभरात थंडीची लाट आली आहे. नाशिकमध्येही थंडीचा कडाका असून दोघांचा या थंडीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोदावरी नदीच्या काठावर दोन मृतदेह आढळले असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गोदावरीच्या काठावर 2 मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गोदावरीच्या काठी असंख्य बेघर राहत असतात त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईसह राज्यात हुडहुडी वाढली मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा खाली आला आहे. थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची हुडहुडी अनुभवायला मिळली आहे. मुंबईत काल गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 6 अंशांनी घसरला आहे. आजही मुंबईत तापमानाचा पारा घसरलेला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये 14.4 तापामानाची नोंद झाली आहे. मुंबईतील शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा 24 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्यानं मागील दहा वर्षातल्या सर्वात कमी कमाल तापमानची नोंद करण्यात आली आहे.तर महाबळेश्वरमध्येही पारा कमालीचा घटला आहे. परिणामी दवबिंदू गोठले आहे. त्यामुळे आज सकाळी वेण्णालेक परिसरात चक्क बर्फाची चादर पाहायला मिळाली. परभणीतही तापमान घसरला आहे. परभणीत 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही आज सरासरी तापमान 5.1 अशं सेल्सिअस तर पाषाण भागातील 4.7 अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.