ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2017 07:29 AM (IST)
मुंबई/वॉशिंग्टन : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं अमेरिकेत वास्तव्य होतं. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचं नाव प्रसिद्ध होतं. गोविंद तळवलकर अनेक वर्षे ''लोकसत्ता''मध्ये सहसंपादक होते. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून तब्बल 28 वर्षे काम पाहिलं. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्यूमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सला महाराष्ट्रातील एक प्रभावी, परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात तळवलकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं बरंचसं लिखाण पुस्तकरुपानं प्रकाशित झालं आहे. गोविंद तळवलकरांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. गोविंद तळवलकर यांचं प्रकाशित साहित्य अग्निकांड :- "युद्धाच्या छायेत" ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा अफगाणिस्तान नौरोजी ते नेहरू (1969) बाळ गंगाधर टिळक (1970) वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड 1 आणि 2) (अनुक्रमे 1979 आणि 1992) परिक्रमा (1987) अभिजात (1990) बदलता युरोप (1991) अक्षय (1995) ग्रंथ सांगाती (1992) डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, 2015) नेक नामदार गोखले पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह) प्रासंगिक बहार मंथन शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख - ललित मासिक, जानेवारी 2016) सत्तांतर (खंड 1-1977 , 2-1983, व 3-1997) सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 आणि 2) गोविंद तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी "दुर्गा रतन" व "रामनाथ गोयंका" पुरस्कार लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार न.चिं केळकर पुरस्कार ("सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त" पुस्तकासाठी) इ.स. 2007 चा जीवनगौरव पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार