सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी शहरातील ओम शांती कॉलनीत भर दिवसा लग्नघरातून 28 तोळे सोनं आणि 40 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. सुभाष शिंदे यांच्या घरी ही चोरी झाली आहे.
शिंदे यांच्या पत्नी अनिता या घराला कुलूप लावून आपल्या मुलीला आणायला कराड येथे गेल्या असता दुपारी 12 तर 3 या काळात घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले. दुकानातून सुभाष शिंदे दुपारी आल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
शिंदे यांनी तात्काळ टेंभूर्णी पोलिसांना संपर्क केला. दरम्यान शिंदेंनी मुलीच्या लग्नासाठी 28 तोळे सोनं आणि नवीन 2 हजाराच्या 20 नोटा कपाटात ठेवल्या होत्या. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने शिंदे कुटुंब हवालदिल झालं आहे.