कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्करा-राजापूर राज्यमार्गावरील अणुस्करा घाटमार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारील शेतांमध्ये 'टस्कर' हत्तीने धुमाकूळ घातला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या 'टस्कर' हत्तीने आपला मोर्चा आता कासारी खोऱ्याकडे वळविला आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्करा परिसरात ऊस, भात, नाचनी पिके फस्त करून हा हत्ती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.
हा 'टस्कर' हत्ती आज कोल्हापूर-अणुस्करा-राजापूर या राज्यमार्गावरील अणुस्करा घाटामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी आढळला. तो ऊस पिकावर ताव मारत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात 'टस्कर' हत्तीचा धुमाकूळ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2018 09:41 PM (IST)
मागील पंधरा दिवसापूर्वी पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या टस्कर हत्तीने आपला मोर्चा आता कासारी खोऱ्याकडे वळविला आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्करा परिसरात ऊस, भात, नाचनी पिके फस्त करून हा हत्ती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -