तासगावमध्ये डांबराची गाडी भररस्त्यात जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2017 09:28 PM (IST)
सांगली : तासगावमध्ये डांबरानं पेट घेतल्यानं गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातल्या गुरुवार पेठेत डांबरी रस्ता तयार करण्याचं काम सुरु असताना, उष्णता वाढल्यानं डांबरानं पेटल्यानं गाडी जळून खाक झाली आहे. गुरुवार पेठेत डांबरी रस्ता तयार करण्याचं काम सुरु होतं. यावेळी उष्णता वाढल्याने डांबरानं पेट घेतला. यात डांबराच्या संपूर्ण गाडीला मोठी आग लागली. यानंतर अग्निशामक दल व लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. पण तोपर्यंत धुराचे लोट परिसरात पसरले होते. यात दोन दुकानांना आगीची झळ बसली. तर भररस्त्यात हा प्रकार घडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. बराच वेळ यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीसह रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. व्हिडीओ पाहा