दिवेआगारमधल्या सुवर्ण गणेशमूर्ती चोरीप्रकरणी 5 जणांना जन्मठेप
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2017 07:50 PM (IST)
रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगारमधल्या सुवर्ण गणपतीच्या चोरी प्रकरणी 5 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर 3 महिलांना 10 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. तसंच दोन सोनारांना न्यायालयानं 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगारमधल्या सुवर्ण गणपतीच्या चोरी प्रकरणी 5 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर 3 महिलांना 10 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. तसंच दोन सोनारांना न्यायालयानं 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दिवे आगारमधील सुवर्ण गणेश मंदिरात 23 मार्च 2012 च्या रात्री दरोडा पडला होता. सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरुन मंदिरातल्या दोन्ही सुरक्षारक्षकांची दरोडेखोरांनी हत्या केली होती. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजलं होतं. अखेर 5 वर्षांनंतर अलिबाग विशेष न्यायालयानं दरोडा आणि हत्याप्रकरणी फैसला सुनावला आहे. दरम्यान, तपास यंत्रणांनी हस्तगत केलेलं सोने सरकारजमा करण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. दुसरीकडे याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा आणि मोका नाकारल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं जिल्हा सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं.