Sushma Andhare  Helicopter Crash :   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश  झाल्याची माहिती समोर येत आहे.   सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप  आहेत.  हेलिकॉप्टर  क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट  आहे.  महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. 


सुषमा अंधारे  हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.  सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे   बारामतीच्या दिशेने जाणर होत्या .  बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या.  बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या.  हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे  म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.  हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत.  


नेमकं काय घडले?


हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहे. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. 


कसे झाले हेलिकॉप्टर क्रॅश?



 


कोण आहेत सुषमा अंधारे?


सुषमा दगडू अंधारे या पेशानं एक वकील आहेत. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 2022 च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.


Sushma Andhare Helicopter Crash Video :


  


हे ही वाचा :


रायगडमध्ये राडा! ठाकरे गटाच्या रायगड जिल्हाप्रमुखावर रात्री हल्ला; भरत गोगावलेंवर टीका केल्यानं हल्ला, ठाकरे गटाचा आरोप