Suresh Dhas on Beed Jail Rada :संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर चार जण असणाऱ्या बीडच्या कारागृहात बबन गीते समर्थक कैदी आणि विरोधक गटामध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्याने बीडच्या कारागृहात गँगवॉर सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे . या वादातून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेलाही तुरुंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिल्यानंतर आता बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं .जेलमध्ये आकांना स्वतंत्र जेवणाचा पुरवठा होतोय . आकांच डायरेक्ट कनेक्शन कोणत्यातरी परळीतल्या एका फोनची होतं तिथपर्यंत माहिती माझ्यापर्यंत आली असल्याचा मोठा दावा भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे .
काय म्हणाले सुरेश धस ?
वाल्मिक कराड पायात चप्पल घालत नाही आणि दुसरा बबन गीते दाढी करत नाही .अशी चर्चा बीडच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून आहे .वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यातील हा वाद असल्याचा दावा सुरेश धस यांनी केल्यानंतर कारागृहातील हाणामारी ही फार मोठी नसल्याचे ही सुरेश धस म्हणाले .दोन्ही गटांमध्ये फार मोठी मारहाण झाली नाही थापड थोपडी पर्यंतच प्रकरण होतं .धावाधावी मात्र झाली .बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात फरार असणारा बबन गीते , महादेव गीते यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं . बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं .माझी माहिती अशी आहे की आकाला स्पेशल जेवणही पुरवलं जातं .स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्या फोनवरून आकाचं डायरेक्ट कनेक्शन परळीतल्या एका फोनवर होतं असा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय . या संपूर्ण प्रकरणात एसपींनी वचक ठेवायला हवा होता .गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या .पेपरमध्ये माहिती आल्यावर याला त्याला सस्पेंड केलं पण व्हिजिट का नाही केली असा सवाल सुरेश धस यांनी केला .जेलमध्ये हाणामारी पर्यंत प्रकरण गेलं . हे सगळे बाहेर मर्डर करून थकलेत . आत जाऊन मर्डर करणार नाहीत कशावरून ? बीडच्या जेलचा सगळा मिळून स्टाफ 45 जणांचा आहे .अनेक जागा रिक्त आहेत एसपींनी हे वर का कळवलं नाही असंही सुरेश धस म्हणाले .
हेही वाचा:
Video: बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, आ. सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण