मुंबई: शरद पवारांचं (Sharad Pawar) वय झालंय, त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, इतरांना मार्गदर्शन करावं असं सातत्याने अजित पवार (Ajit Pawar) म्हणताना दिसत आहेत. सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवारांना अद्याप त्यावर जाहीर प्रत्युत्तर दिलं नसलं तरी त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेलांना (Praful Patel) मात्र सोशल मीडियावर एक रिप्लाय दिला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली. हरयाणातील 107 वर्षीय महिलेने हैदराबादमधील स्पर्धेत दोन सुवर्ण पटकावले आणि प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या वयाचा संदर्भ देत जाहीर कौतुक केलं. त्याचवेळी सुप्रिया सुळेंनेही त्याला रिप्लाय देत,  वय हा फक्त आकडा असतो असा टोला लगावत आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. 


नेमकं काय आहे प्रकरण? (Rambai Haryana Athlet) 


हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यातील कदमा गावात राहणाऱ्या 107 वर्षीय रामबाई यांनी हैदराबादमधील एका राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदकं पटकावली. त्यांच्या या कामगिरीवर सर्व देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 


प्रफुल्ल पटेलांचे ट्विट (Praful Patel Tweet On Rambai) 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रामबाई यांचे कौतुक करताना एक ट्विट केलं. त्यामध्ये पटेल म्हणाले की, रामबाईंची इच्छाशक्ती आणि पॅशन पाहिलं तर वय हा फक्त एक नंबर आहे याची जाणीव होते. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी वयाची कोणतीही एक्सपायरी डेट नसते हे 107 वर्षांच्या रामबाईंनी सिद्ध केलंय. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलिटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण पदकं जिंकली. त्यामुळे कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे आपण मनावर बिंबवूया आणि त्या पद्धतीने काम करूया. 


 






सुप्रिया सुळेंचा एका वाक्यात रिप्लाय (Supriya Sule Reply To Praful Patel) 


प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या ट्विटला खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच वाक्यात रिप्लाय दिला आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे, वय हा फक्त एक नंबर आहे. 


 






सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला (Supriya Sule Slams Ajit Pawar) 


अजित पवारांनी आतापर्यंत अनेकदा, जाहीर सभेतून शरद पवारांच्या वयावर वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी वयाचा विचार करून आता निवृत्ती घ्यावी आणि मार्गदर्शन करावं, त्यांचं वय झालंय असं अजित पवार म्हणालेत. त्यांना सुप्रिया सुळे यांनी अजूनही थेट उत्तर दिलं नसलं तरी या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी एकाच वेळी अजित पवारांना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येतंय.


ही बातमी वाचा: