मुंबई शिक्षक भरती (Shikshak Bharti)  प्रक्रियेवरून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)  आणि एक महिलेमध्ये शाब्दिक चकमक उडाली... यावरून दीपक केसरकर संतप्त झाले. हा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असे सांगतानाच त्यांनी, तुमचे नाव घेऊन डिस्क्वालिफाय करायला लावेन, असा इशाराही दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केसरकरांवर टीका केली आहे.  महिलेची शिक्षणमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, आई-वडिलांनंतर सगळ्यात महत्त्वाचे शिक्षक असतात ज्या पद्धतीने त्या महिलेचा अपमान शिक्षण मंत्र्यांनी केलेला आहे . हा अपमान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. त्या महिलेची माफी शिक्षणमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. एका महिला शिक्षकेचा अनादर या ट्रीपल इंजिन सरकारने केला आहे. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. 


शिक्षणमंत्र्यांची उमेदवार महिलेला धमकी?


गेल्या पाच वर्षांपासून एक शिक्षक महिला भरतीची वाट पाहत आहे. सरकारने तीस हजार शिक्षकांची भरती घोषित केल्यावर तिने शिक्षक भरतीसाठी अर्ज केला पण सरकारी प्रक्रिया काही पुढे सरकेना. शिक्षणमंत्री जिल्ह्यात आले म्हणून तीने त्यांनाच याबाबत विचारलं पण साधी तरूण मुलगी आपल्याला चारचौघात प्रश्न विचारण्याची हिंमत करते याचा मंत्री दीपक केसरकरांना भलताच राग आला. मग काय मंत्री महोदयांनी या मुलीची अक्कलच काढली.  दीपक केसरकर हे या महिलेवर चांगले संतापल्याचा पाहायला मिळाले.  माझ्याशी बेशिस्त वर्तन कराल तर तुमची माहिती घेऊन तुम्हाला डिस्क्वालीफाय करतो अशी थेट धमकीच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या महिलेला दिली.


बेशिस्त वर्तन कराल तर तुमचे नाव घेऊन तुम्हाला डिसक्वालिफाय करायला लावेन


दीपक केसरकर हे कपिलधार येथे महापूजेसाठी आले होते यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याने या महिलेने दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला असता दीपक केसरकर हे या महिलेवर चांगलच भडकले. मला विद्यार्थीप्रिय शिक्षक पाहिजेत ऑनलाईन भरती जरी होत असली तरी सर्व साईट व्यवस्थित चालत असल्याचे सांगत तुम्ही जर बेशिस्त वर्तन कराल तर तुमची माहिती घेऊन तुम्हाला डिसक्वालिफाय करतो असं म्हणताच महिलेला देखील अश्रू अनावर झाले.


आपल्या मुलांना प्रश्न विचारायला शिकवतो तो खरा शिक्षक असतो.  समोर आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचा  प्रयत्न करते ती खरी व्यवस्था असते. शिक्षिकेने आपलं काम चोखंच केलं, पण मंत्रीमहोदय तुम्ही मात्र सपशेल चुकलात, वेळीच या चुका सुधारा