Prakash Ambedkar on OBC Reservation :  राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची ( Riots)  शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी केला आहे. तसंच 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे, असंही आंबेडकर म्हणाले. तसंच देशात मुस्लिमांना (Muslim) आणि ओबीसींना (OBC) टार्गेट केलं जात आहे.  प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केलं त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


आंबेडकर म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.  ओबीसींनी सतर्क राहा. 


Prakash Ambedkar on OBC Reservation : 2024 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नााहीत : आंबेडकर


आंबेडकर म्हणाले, महात्मा फुले यांनी जो लढा सुरू त्याची फळे आपण चाखत आहे. सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषदने हे म्हटले नसले  तरी फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं संविधान बदलणार नाही. जोपर्यंत आर आर एस चे प्रमुख मोहन भागवत आहे असे वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नाही. 2024 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नााहीत. 


Prakash Ambedkar on OBC Reservation : आपण कुठलाही प्रश्न धार्मिक चष्म्याने पाहतो : आंबेडकर


तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटनेची बैठक मुंबईमध्ये झाली. 8 डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषयावर आझाद मैदानावर सभा घेणार आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवं, भाजप मुस्लिम विषय आहे म्हणून सोडून द्या असे सांगत आहे. आपण कुठलाही प्रश्न धार्मिक चष्म्याने पाहतो, आपल्याला तशीच सवय लावली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  


Prakash Ambedkar on OBC Reservation : ओबीसीचा जनक मी आहे : आंबेडकर


प्रकाश आंबेडकर म्हणाले,  भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. उलट वार मी न्यायालयात केले आहे. त्यांनी कधी आभार मानले नाही. मला कोणाची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या मग कळेल, ओबीसीचा जनक मी आहे.  


हे ही वाचाा :


Prithviraj Chavan on NCP : राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं : पृथ्वीराज चव्हाण