औरंगाबाद : दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत.

 
औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

 
प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे.

 
दरम्यान मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


संबंधित बातम्या :


दुष्काळासाठी उसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार