Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी सुनावणी
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी आज सुुप्रीम कोर्टात दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहे. या दोन्ही सुनावण्यांचे प्रत्येक अपडेटस एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2023 04:21 PM
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आजपासून सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने दोन याचिका सु्प्रीम कोर्टात दाखल केल्या होत्या....More
नवी दिल्ली : शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आजपासून सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने दोन याचिका सु्प्रीम कोर्टात दाखल केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं असल्याचा निकाल दिला होता. या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणाराय. तर तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यावरही सुनावणी होणार आहेकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टातदरम्यान सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज या याचिकेवर सुनावणी होईल. विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिकाएकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये पडणार का, या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देणार का याची उत्सुकता लागली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Anil Desai : सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची प्रतिक्रिया
Anil Desai : डेडलाईन आणि सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा - अनिल देसाई