सतीश होंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या प्रकरणाचा तपास कसून व्हायला होणं अपेक्षित होतं. मात्र पोलिसांनीच आरोपींना मदत केली असून पोलिसांचीही सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी, हत्या झालेल्या सुमित्रा यांचे वडील विश्वंभर तारख यांनी केली आहे.
अतिप्रसंगाला विरोध केल्याने चुलतदीराकडून महिलेची हत्या
2 जानेवारीला अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी सुमित्रा होंडे यांची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुमित्रा यांचा चुलत दीर विलास होडेंनं हत्येची कबुली दिली असून त्याला अटक झाली आहे. अतिप्रसंगाला विरोध केल्याने आपण गोळी झाडल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.
काय घडलं होतं?
अंबड शहरातील इंद्राणी कॉलनीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश होंडे राहतात. दुपारी होंडे यांचा पुतण्या घरी आला त्यावेळी त्याला सुमित्रा जखमी अवस्थेत दिसल्या. त्यानंतर त्याने कॉलनीतील नागरिकांना घटनेची माहिती दिली.
शेजाऱ्यांनी सुमित्रा यांना तातडीने अंबड मधील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं. मात्र सुमित्रा यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यानं त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं.