औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराची दुरावस्था, सुमित राघवनकडून फेसबुक लाईव्ह
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2017 11:06 AM (IST)
महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्था किती बिकट आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरातील स्टेज आणि मेकअपरूमच्या दुरवस्थेचा फेसबुक लाईव्ह करुन अभिनेता सुमित राघवननं व्हिडीओ शेअर केला आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अवस्था किती बिकट आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरातील स्टेज आणि मेकअपरूमच्या दुरवस्थेचा फेसबुक लाईव्ह करुन अभिनेता सुमित राघवननं व्हिडीओ शेअर केला आहे. मोडका स्टेज मेकअप रूममधल्या अपुऱ्या सोयींची तक्रार त्यानं या मध्यमातून केली आहे. अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हे दोघे 'एक शून्य तीन' या नाटकाच्या प्रयोगासाठी काल औरंगाबादमध्ये होते. काही दिवसांपूर्वी सुमितने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यागृहातील व्हीआयपी रुमच्या दुरवस्थेचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. अशीच नाट्यगृहांची दुरवस्था प्रशांत दामले, मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले यांनीही नाट्यगृहांची दाखवली होती. पाहा व्हिडीओ -