मुंबई : ईडीने (ED) कोविड घोटाळा (Covid Scam) मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केलेल्या आरोपी सुजित पाटकरने महामारीच्या काळात अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना भेटण्यासाठी त्याचा मित्र आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ओळख वापरल्याचा ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
मुंबई (Mumbai) कथित जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी (Covid Scam) ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. पाटकर कंपनीने 60 टक्के कमी कर्मचारी पुरवले होते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करुन जास्तीचे बिले बीएमसीला पाठवली होती. एवढच नाही तर कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड 19 उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला होता. या चक्रीवादळावेळी केंद्रातील सर्व रुग्णांना एका दिवसासाठी इतर रुग्णालयात हलवले होते त्या दिवशीची बिले देखील पाठवली. डॉ.किशोर बिसुरे यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे हा मुद्दा मांडूनही कारवाई झाली नाही. केवळ 31 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
संजय राऊतच्या नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवले. या कॉन्ट्रॅक्टविषयी संजय राऊतांना माहित होते. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. याच लोकांना खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्यातले पैसे संजय राऊतांची मुलगी आणि भावाच्या खात्यात गेल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
ईडीचा दावा काय?
सुजित पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना राजकीय नेतांच्या प्रभावामुळे कोविड सेंटरचे काम मिळाल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत होता. तसेच, याबद्दल स्वत: सुजित पाटकर यांनी खुलासा केला असल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तर या लाईफलाईन रुग्णालयांमध्ये कोविड कालावधीत अनेक आर्थिक घोटाळे झाले असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या प्रकरणात अनेक गैरव्यवहार झाल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणात आणखी कोणती माहिती सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :