ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलीचा थंडीने मृत्यू
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 26 Jan 2018 01:07 PM (IST)
लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलाचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रातिनिधिक फोटो
लातूर : राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याच थंडीने एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला आहे. लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलाचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील खलग्री शिवारात सध्या ऊसतोडणी सुरु आहे. या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील आमटी या गावातील ऊसतोड कामगार आले आहेत. ज्या ठिकाणी ऊसतोडणी सुरु आहे त्याच्या बाजूलाच राहण्यासाठी कापडी आसरा केला आहे. या झोपडीवजा आसऱ्यात राहिल्यामुळे ही घटना घडली. ऊसतोड कामगार बाळू नामनौर आणि त्यांची पत्नी ऊसतोडणीसाठी लातूर जिल्ह्यात आले आहेत. उपजिविका भागवण्यासाठी ऊसतोडणीला आलेल्या या दाम्पत्याला आपली तीन महिन्यांची चिमुकली गमवावी लागली आहे.