वाशिम : स्मशानभूमी म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच प्रतिमा येते. हीच बदलण्यासाठी 30 ते 40 वाशिमकर झटत आहेत. त्यामुळेच स्मशानभूमीत ध्वजारोहण करण्याची परंपरा त्यांनी सुरु ठेवली आहे.


वाशिममधील स्मशानभूमीत गेल्या दहा वर्षांपासून ध्वजारोहण केलं जातं. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन अशा दोन्ही दिवशी इथे ध्वजवंदन केलं जातं.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीशिवाय विविध सणही इथे साजरे केले जातात. वाशिमकर एकत्र येऊन होळी, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी असे विविध सण-उत्सव स्मशानभूमीत साजरा करतात.

ही स्मशानभूमी म्हणजे एक पवित्र स्थान असून सगळ्यांना याच ठिकाणी जगाचा निरोप घ्यावा लागतो. त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी हे लोक एकत्र येऊन विविध कार्यक्रम साजरे करतात.