मी केवळ दर्शनासाठी गेलो होतो, पुजेसाठी नाही : मुनगंटीवार

Continues below advertisement
उस्मानाबाद : "मी तुळजापूरला केवळ दर्शनासाठी गेलो होतो. पण मी कोणतीही पूजा करणार नव्हतो आणि केलीही नाही," असं स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.   सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीची प्रक्षाळ पूजा एक तास उशिराने झाल्याचं म्हटलं जात होतं. मुनगंटीवारांना पंढरपूरहून तुळजापूरला येण्यास रात्रीचे 10. 25 वाजले. ते येईपर्यंत देवीची प्रक्षाळपूजा आणि शेजारती थांबवण्यात आली होती.  

मुनगंटीवारांच्या विलंबामुळे तुळजाभवानीची शासकीय पूजा उशिरा

  दररोज 9 वाजताच होणारी प्रक्षाळपूजा 11 वाजता करण्यात आली आणि शेजारती होऊन मंदिर बंद करायला रात्रीचे साडेअकरा वाजले. वर्षानुवर्षे देवीच्या धार्मिक विधींचं हे वेळापत्रक केवळ एका मंत्र्यांच्या हजेरीमुळे बिघडलं. याबाबत भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.   मात्र मी केवळ दर्शनासाठी गेलो होतो, पुजेसाठी नाही, असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola