बीड : स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे याच्या बेकायदेशीर दवाखान्या वर छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी एक डिजिटल एक्स-रे मशीन पोलिसांना आढळून आले आहे हे मशीन कोठून आणले याची चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे अशी एक्स-रे मशीन फक्त रेडिओलॉजिस्ट यांनाच विकत घेण्याचे अधिकार असताना ते सुदाम मुंडे यांनी मिळवले कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


आरोग्य विभागाने पोलिसांनी संयुक्तरित्या सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलवर छापा टाकल्यानंतर सुदाम मुंडेला परवा रात्री अटक करण्यात आली होती. काल त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुद्धा परळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावली होती.


परळी पासून तीन किलोमीटर अंतरावर ते परळी नंदागौळ रोड वरती एका शेतामध्ये निर्जनस्थळी चालू असलेल्या सुदाम मुंडे यांच्या दवाखान्यामध्ये कोरोना सदृश्य रुग्णावर ती सुद्धा मुंडे उपचार करत असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे यावेळी या हॉस्पिटलवरती छापा टाकण्यात आला. त्यावेळी सुद्धा चार रुग्णांवरती या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे आढळून आले होते.


सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याआधी या चार रुग्णांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषध गोळ्यांचा साठा आढळून आला होता. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.


या बोगस दवाखान्यात औषध आणि गोळ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या. त्या फार्मासिस्ट शिवाय कुणालाही विकण्याचा अधिकार नसतानाही डॉक्टर सुदाम मुंडे याने नेमका कुठून औषधे मिळाली याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. यापूर्वी 2012 मध्ये सुद्धा मुंडे यांच्याविरोधात स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणांमध्ये मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर सुद्धा बनावट हॉस्पिटल चालवणाऱ्या सुदाम मुंडे ला कोणी कोणी व कशा प्रकारची मदत केली याचा तपास आता परळी पोलिस करत आहेत.


गंभीर बाब म्हणजे गोळ्या औषध तर आहेतचं पण सोबतच गर्भपातासाठी लागणारी साधन सामुग्री सुद्धा आरोग्य विभागातील अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी हस्तगत केली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा तपास आता परळी पोलिसांनी सुरू केला आहे.


संबंधित बातम्या :




Female Feticide | जेलची हवा खाल्ल्यानंतरही सुदाम मुंडेचा काळा धंदा सुरूच, स्त्री भ्रूण हत्येचा पर्दाफाश