सोलापूर : आरक्षित जागेत बंगला बांधल्याप्रकरणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता देशमुख यांना महापालिकेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांसमोर आज महापालिकेत सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्ते महेश चव्हाण यांनाही पुराव्यानिशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याखालची जमीन पालिकेच्या अग्नीशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधला आहे.
बंगल्यासंबंधी प्रत्येक बाबीसाठी आपण जबाबदार राहू, असं प्रतिज्ञापत्र देशमुख यांनी महापालिकेला दिलं आहे. त्यानंतर महापालिकेने बांधकामासाठी सशर्त परवानगी दिली. मात्र आजही ही जागा आरक्षित असल्यानं देशमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
सुभाष देशमुखांचा बंगला बेकायदेशीरच?
आरक्षित जागेवर बंगला, सहकार मंत्री सुभाष देशमुखांना नोटीस