Pune School : 1 ते 20 पटसंख्या (School) असेलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात पुण्यातील (Pune) मावळमधील (maval) धालेवाडी-महागाव येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी निषेध मोर्चा काढला. यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. वाडी, वस्तीवर दुर्गम भागात असणाऱ्या या कमी पटाच्या शाळा जर बंद झाल्या तर वाडी वस्तीवरील गोर गरीब, आदिवासी, कुटुंबातील मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतील. त्यांना योग्य शिक्षण मिळावं यासाठी सगळ्यांनी पावित्रा घेतला आहे.
1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावरुन राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी पालक एकत्र आले आहेत. पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि शाळा बंद करु नये या मागणीसाठी पालकांनी मोर्चे काढले आहेत. शाळा बंद झाल्यामुळे गोरगरीब, वंचित आणि मुली शिक्षणावर परिणाम होईल. कमी पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम भागात वाहतुकीच्या सुविधा नसणाऱ्या ठिकाणी आहेत. या शाळा बंद झाल्याचे ते शिकणारे आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे.
पुणे जिल्ह्यातील 1000 शाळा बंद होण्याची शक्यता
पुणे जिल्हा परिषदेने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या सुमारे 1,000 शाळा शोधल्या आहेत. शाळा विलिनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 3,629 पैकी 1,000 हून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. शाळा विलिनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 3,629 पैकी 1,000 हून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांना 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे. शाळा विलिनीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 3,629 पैकी 1,000 हून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या'
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेवर निघाले आहेत. 'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करु नये म्हणून ऑगस्ट महिन्यात देखील इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन केले होते.