बीड : ‘आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’, असे भिंतीवर लिहून अंबाजोगाईतील बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (18) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभ्यासाच्या तणावातून गुरुप्रसादने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शहरातील योगेश्वरी नगरी भागात उघडकीस आली.
गुरुप्रसादचे वडील अंबाजोगाई येथील एका शाळेत शिक्षक आहेत. गुरुप्रसादच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यामुळे घरात फक्त तो आणि त्याचे आई-वडीलच असतात. हे कुटुंब योगेश्वरीनगरीमध्ये राहते. गुरुप्रसाद सध्या योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती आणि वडील शाळेत होते.
आज दुपारी 4 वाजताच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी 7 वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून हादरून गेले.
नोटमध्ये लिहिले ‘आय क्विट..’
'या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)' अशा आशयाचा संदेश गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे.
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, भिंतीवर सुसाईड नोट लिहिली, बीडमधील घटना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2019 08:17 AM (IST)
मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती आणि वडील शाळेत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -