Scholarship Scheme : राज्यातील सर्व शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीमध्ये होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्य सरकरने हा निर्णय घेतला आहे. 1 जून 2022 पर्यंत शिष्यवृत्ती योजना आधार कार्डशी जोडण्याची कार्यवाही सरकारकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे यापूर्वी आरोप करण्यात आले होते. त्यामुळे हे गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि राज्यातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेताल आहे.
दरम्यान, राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने जानेवारीमध्ये घेतला होता. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने घेतला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा अचानक बंद कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे 20 फेब्रुवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण परिषदेकडून घेण्यात आला होता. या परीक्षांची नवीन तारीख उद्याप जाहीर करण्यात आली नाही.
महत्वाच्या बातम्या
'पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली', राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निर्णय