हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीवर बलात्कार, संचालकासह दोघे अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2016 10:32 AM (IST)
हिंगोली : गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना हिंगोलीत घडली आहे. शहरातील विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थिनीवर केंद्र संचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर हे फोटो सोशल साईट्सवर टाकू, अशी धमकी देत तिच्यावर 3 महिने सतत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीने हिंगोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर केंद्र संचालक शेख अफजल महेबूब, प्रशिक्षक मीर अश्फाक मीर आणि वैजनाथ गायकवाड या तिघांना अटक करण्यात आली आहे.