Student Protest Live Updates : बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, पाहा लाईव्ह अपडेट

student protest Live Updates : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात. या मागणीसाठी अचानकपणे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे.

abp majha web team Last Updated: 31 Jan 2022 06:06 PM
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड धारावीत




शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून आज मुलांनी गोंधळ घेतला त्या धारावीतील जंक्शनवर येत पाहाणी केली. मात्र काही पण बोलल्या नाही. सकाळपासून यावर बोलत आहे.  

 



 


जळगावमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
 दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.  दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन न घेता ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात .अभ्यासक्रम हा ऑनलाईनच असल्यामुळे ऑफलाइन न घेता ऑनलाईनच घेण्यात यावे या या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होते मोठ्या संख्येने विद्यार्थी या मध्ये सहभागी झाल्याच पाहायला मिळाले आहे.

बाईट विद्यार्थी
बीडमध्ये विद्यार्थ्यांचं रॅली काढत आंदोलन 

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात, ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खाजगी वाहनांनी यायचं म्हटलं तर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळं ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे...


 

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या, कोल्हापुरातही विद्यार्थ्यांचं आंदोलन

 दहावी- बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी अशी मागणीसाठी आज मुंबई विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी देखील याच मागणीसाठी आंदोलन केलं. कोल्हापुरातील एसएससी बोर्ड कार्यालयाबाहेर एकत्र जमत केलं.ज्यात पालकांनी ही सहभाग घेतला. या आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झालेले असताना परीक्षा ऑफलाइन का? असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय इतकच नाही तर ऑफलाइन परीक्षेदरम्यान कोरोना संसर्ग वाढल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी देखील विचारणा या विद्यार्थी आणि पालकांनी केलीय


 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिथे जिथे आंदोलन होतंय तेथील गर्दी नियंत्रणात आणा, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. 

कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

दहावी- बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी देखील आंदोलन केलं.. कोल्हापुरातील एसएससी बोर्ड कार्यालयाबाहेर एकत्र जमत केलं...ज्यात पालकांनी ही सहभाग घेतला..या आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.. शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झालेले असताना परीक्षा ऑफलाइन का? असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय इतकच नाही तर ऑफलाइन परीक्षेदरम्यान कोरोना संसर्ग वाढल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी देखील विचारणा या विद्यार्थी आणि पालकांनी केलीय...

तोडफोड केल्यामुळे आंदोलनाला गालबोट लागलं

Mumbai Protest Latest pupdate : दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी या मागणीसाठी आज नागपुरात सुमारे दोन हजार विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत उतरले होते... आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांना फोन केले. मात्र बंटी शेळके सध्या पंजाबमध्ये असल्या कारणाने त्यांनी नागपूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस नयन तळवटकर यांना काही कार्यकर्त्यांसह आंदोलनात पाठवले. हे विद्यार्थी योग्य मागणीसाठी आंदोलन करत होते, मात्र तोडफोड केल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला गालबोट लागलं... हे विद्यार्थी अनुभवी नसल्यामुळे ते काहींच्या चिथावणी ला बळी पडले असं युथ काँग्रेसकडून आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे... हिंदुस्तानी भाई नावाच्या व्यक्तीने त्यांना चिथावणी दिली होती असे युथ काँग्रेसचे म्हणणे आहे....

हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध सुरू, बच्चू कडू यांची माहिती

परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय लगेच घेणार नाही, आधी आंदोलनात कोण हे पाहणार, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 

औरंगाबाद नागपूर उस्मानाबादनंतर बीड मध्येही विद्यार्थी रस्त्यावर..

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खाजगी वाहनांनी यायचं म्हटलं तर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळं ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे...

पुणे - एचएससी बोर्डाच्या ऑफिस समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन .

पुणे - परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा अशी दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांची मागणी... ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध. पुण्यातील एचएससी बोर्डाच्या ऑफिससमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे . आगामी परीक्षा  रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आमचे सगळे क्लास ऑनलाईन झाले आहेत त्यातच अभ्यासक्रम आम्हाला बिलकुल समजला नाही अभ्यासक्रम पूर्णही झाला नाही अशात आम्ही परीक्षेला सामोर कस जायचं असा सवाल करत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

पार्श्वभूमी

student protest Live Updates : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात. या मागणीसाठी अचानकपणे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. मुंबई, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूरसह अनेक शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी बसची तोडफड केली आहे. 


नागपूरमध्ये पोलिसांनी काही निवडक विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत नेले, त्यानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. दरम्यान दहा दिवसात प्रशासनाने आमच्या मागण्या संदर्भात निर्णय घेतला नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू... राज्याच्या मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे... त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना चिथावणी देणारा कोण??? आणि त्याचा उद्दिष्ट काय??? हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही....


दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज प्रमाणे हिंदुस्तानी भाऊ नावाच्या युट्युबरचे व्हिडिओ पाहून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करू आणि विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा कोण आहे... त्याचा शोध घेऊ असं मत व्यक्त केलं आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचेही सांगितलेय. 


सध्यातरी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर आणि ऑफलाईन होणार, विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये : शिक्षणमंत्री 
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शनिवारी म्हणाल्या की, "राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत."


"शिक्षणात क्लासरूमचा फिल येत नाही. तोपर्यंत इनटरअॅक्टिव्ह सेशन येत नाही, तरी मिस होत असतं. अकरावीचे अॅडमिशन ऑनलाईन व्हावं अशा आमच्या अपेक्षा आहेत. पुढचं वर्ष विद्यार्थ्यांचं वेळेत सुरु व्हायला हवं, हिच अपेक्षा. पंधरा तारखेपर्यंत आढावा घेऊन भूमिका ठरवू. तसेच, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवू.", असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतिलं आहे. तसेच सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील, अशी शक्यता असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.