भंडारा: मोकाट कुत्र्यांची नसबंदी करुन, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आसामचं प्रशिक्षित पथक भंडाऱ्यात दाखल झालं आहे.
भंडारा जिल्ह्यातील पीपल्स फॉर एनिमल्स या संस्थेने पुढाकार घेत, शहरी तसेच ग्रामीण भागातील मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांची नसबंधी शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी त्यांनी आसामच्या पथकाची मदत घेतली आहे.
सध्या भंडाऱ्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतल्याने, नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे नागरिकांनी टोकाची पावलं उचलत, कुत्र्यांना विष देऊन मारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
याबाबत पीपल्स फॉर एनिमल्स या संस्थेने जव्हार नगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे संस्थेने मोकाट कुत्र्यांच्या जन्मदरावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकसहभागातून गावात धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्यांवर नसबंदीची शत्रक्रिया तसेच त्यांना अँटी रेबीजचे इंजेक्शन देण्यात येत आहे. सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मोकाट कुत्र्यांना बटरफ्लाय जाळीच्या सहाय्याने पकडून, त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवून, पुन्हा त्या त्या क्षेत्रात सोडलं जातं.