अहमदनगर: अहमदनगरच्या अकोले शहरात मिरवणुकीसाठी आणलेल्या एका हत्तीनं पाण्यातच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे मिरवणुकीला चक्क चार तास उशीर झाला आहे.


गेल्या पाच तासापासून हा हत्ती प्रवरा नदीच्या पात्रात मनसोक्त आंघोळ करतोय. त्याच्या मालकानं/माहुताने त्याला बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र हत्ती त्याला दाद देत नाही.

अकोल्यात खंडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सकाळी 7 वाजता मिरणूक काढली जाणार होती, मात्र अजूनही ही मिरवणूक सुरु झालेली नाही.

मिरवणुकीचा हत्तीच नदीबाहेर न आल्याने, मिरवणूक काढायची कशी हा प्रश्न आयोजकांना पडला आहे. आणखी काहीवेळ हत्ती बाहेर न आल्यास, हत्तीशिवाय मिरवणूक काढण्याची तयारी आयोजकांनी केली आहे.

दरम्यान, हत्तीला मनसोक्त डुंबताना पाहण्यासाठी प्रवरा नदीच्या पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.