नागपूर : शेतीला मीटरनेच वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने नवी योजना आणली आहे. पाच हजार कोटी रुपयांच्या योजनेचं टेंडर आज जारी करण्यात आलं.

दोन शेतकऱ्यांसाठी एक डीपी, असा क्रांतीकारी बदल या योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

तेलंगणा आणि गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. 16 केव्हीच्या वापरापर्यंत दोन शेतकऱ्यांसाठी एक डीपी हा मोठा बदल आहे मानला जात आहे.

पूर्वी 63 किंवा 100 केच असे डीपी दिले जायचे. आता 16 केव्हीचे डीपी दिले जातील. पूर्वी कमी उच्चदाब वाहिनीवरून शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत होता.

नव्या प्रणालीमध्ये उच्च दाब वाहिनीवरून शेतीला थेट वीजपुरवठा होईल. राज्यातील 80 टक्के शेती पंप हे विनामीटर होते. आता शंभर टक्के पंप हे मीटरवर येतील.