मुंबई : राज्य सरकारचं ‘मोदीप्रेम’ देशाचं भवितव्य असलेल्या युवा पिढीच्या माथीही मारलं जातं आहे. राज्याच्या शिक्षण विभागानं चक्क महापुरुषांच्या यादीत मोदींना नेऊन बसवलं आहे. शाळेतील ग्रंथालयांसाठी फुले, शाहू, आंबेडकारंपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागानं तब्बल 60 लाख रुपये मोजले आहेत.
मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मोदींच्या चरित्र पुस्तकांचं शाळांमध्ये वितरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे, चाचा चौधरींवरच्या पुस्तकांनीही महापुरुषांच्या पुस्तकांवर मात केली आहे.
विविध शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरूषांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांची दरवर्षी चरित्र पुस्तके खरेदी केली जातात. तसेच ही पुस्तके त्या त्या शाळांच्या ग्रंथलयात पाठविली जातात. मात्र यंदाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्र पुस्तकांची खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात येणार असून या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा सर्वाधिक पुस्तके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असणार आहेत.
शिक्षण विभागाच्या टेंडर वाटपाच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा शालेय विभाग विद्यार्थ्यांचं नेमकं कोणतं भविष्य घडवणार आहे हे तुम्ही-आम्ही न विचारलेलं बरं.
सरकारचं ‘मोदीप्रेम’, महापुरुषांपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकांची खरेदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Feb 2018 05:53 PM (IST)
मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मोदींच्या चरित्र पुस्तकांचं शाळांमध्ये वितरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे, चाचा चौधरींवरच्या पुस्तकांनीही महापुरुषांच्या पुस्तकांवर मात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -