रायगड : गटारी अमावस्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारु चोरुन महाराष्ट्रात आणणाऱ्या ट्रकला पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.
गोव्यातून चोरट्या मार्गाने दारु महाराष्ट्रात आणली जात असल्याची खबर रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागली होती. त्या पर्शवभूमीवर रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाने मुंबई गोवा महामार्गावर पालीजवळ रचलेल्या सापळ्यात आज पहाटे हा ट्रक पकडण्यात आला.
या ट्रकमध्ये जवळजवळ दोन लाख रुपयांची दारु ड्रायव्हर केबिन आणि अन्य ठिकाणी लपवून ठेवलेली आढळून आली. चालकाने आपण ही दारु गटारी साजरी करण्यासाठी गोव्यातून आणली असल्याचे म्हटले आहे. उत्पादन शुल्क विभागाने चालकाला ताब्यात घेतले आहे.
गटारीसाठी 2 लाखांची दारु, मुंबई-गोवा हायवेवर ट्रक पकडला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2017 08:00 PM (IST)
गटारी अमावस्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारु चोरुन महाराष्ट्रात आणणाऱ्या ट्रकला पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -